Ratnagiri : फणसोप येथे वृद्धाची गळफासाने आत्महत्या

रत्नागिरी : शहरानजीकच्या फणसोप सडा येथील मानसिक रुग्ण असलेल्या वृद्धाने आपल्या जनरल स्टोअरमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

दीपक पुरुषोत्तम साळवी (६३, रा. फणसोप सडा, लक्ष्मीकेशवनगर, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या मुलाने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, त्याच्या वडिलांवर गेल्या पाच वर्षांपासून ते मानसिक रुग्ण असल्याने औषधोपचार सुरू होते. ते कसोप बस स्टॉप येथे जनरल स्टोअर चालवत होते. दरम्यान, बुधवारी सायंकाळी त्यांचा मुलगा वडिलांना दुकानात पाहण्यासाठी गेला असता त्याला दुकानाचा लोखंडी दरवाजा बाहेरुन कडी लावलेला व आतून दरवाजा उघडा दिसला. म्हणून त्याने दुकानात जाउन पाहिले असता त्याला वडील दुकानाच्या आतील गॅल्व्हनाईज पाईपला फिटिंगच्या वायरने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मुलाने आरडा-ओरडा करुन आजुबाजूच्या नागरिकांच्या मदतीने वडिलांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून रात्री ८ वाजता मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 28/Oct/2025