Konkan Railway : एलटीटी ते तिरूवनंतपुरम् रेल्वेच्या फेऱ्या २७ नोव्हेंबरपर्यंत

खेड : कोकण रेल्वे मार्गावर दि. २५ सप्टेंबरपासून चालवण्यात येत असलेल्या एलटीटी-तिरूवनंतपुरम् साप्ताहिक एक्स्प्रेसच्या फेऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या फेऱ्या २७ नोव्हेंबरपर्यंत धावणार असून, त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. दर गुरुवारी एलटीटी येथून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०:१५ वाजता तिरुवअनंतपुरम येथे पोहोचते. ही गाडी प्रवाशांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 28/Oct/2025