खेड : गुणदे-सडावाडी येथे विठ्ठल-रखुमाई मंदिरात आज मूर्ती प्रतिष्ठापना

सावर्डे : खेड तालुक्यातील गुणदे- सडावाडी येथे श्री विठ्ठल-रखुमाईचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरातील श्री विठ्ठल-रखुमाई व इतर देवतांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा गुरुवारी (ता. २४) होणार आहे.

या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये सकाळी ६ ते ९ महासंकल्प, गणेशपूजन व स्वस्ति पुण्यावाचनादी विविध आवाहित मंडळ देवतापूजन, सकाळी ९ ते १० मूर्ती रुद्राभिषेक, १० ते ११ अग्निस्थापना यज्ञकर्म, ११ ते १२ मूर्ती प्राणप्रतिष्ठा, १२ ते १ महाआरती, १ ते २ महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ७ वारकरी सांप्रदाय गुणदे यांचे हरिपाठ, ७ ते ९ चिरणी येथील ह. भ. प. जनार्दन महाराज आंब्रे यांचे कीर्तन, रात्री ९ ते १० महाप्रसाद, १० नंतर वारकरी सांप्रदाया गुणदे यांचे हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 24-10-2024