रत्नागिरी : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. यात विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. रत्नागिरीत उदय सामंत, दापोली योगेश कदम यांच्या नावासह उद्योगमंत्र्यांचे भाऊ किरण ऊर्फ भैया सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, सामंत बंधूंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर अजित पवारांनी पुढचं पाऊल टाकतं लक्ष १७ जणांना एबी फॉर्मचे वाटप केले होते. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी आता ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. शिदेंच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. शिदेंच्या नेतृत्वात लढली जाणारी ही पहिली निवडणूक आहे.
विधानसभेमध्ये प्रथमच शिवसेनेचे धनुष्य आणि उभाठाची मशाल आमनेसामने येणार आहे. कोकण हा ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेला असून, या बालेकिल्ल्याची तटबंदी मजबूत राहणार की शिंदे शिवसेना ती ढासळवणार, याकडे ग्रामीण भागातील मतदारांचे लागून आहे. रत्नागिरीमध्ये राहिले राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. ते पाचव्यांदा विधानसभेला सामोरे जात आहेत. खेडचे आमदार योगेश कदम हे दुसऱ्यांना विधानसभेला सामोरे जाणार आहेत. पालकमंत्री सामंत यांचे मोठे बंधू किरण ऊर्फ भैय्या सामंत हे प्रथमच राजापूरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 24/Oct/2024














