रत्नागिरी : शहरातील रेल्वेस्टेशन स्टॉप आणि आठवडा बाजार येथील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, २१ व २२ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. नंदकुमार धोंडिराज रुक्के (५४) आणि बैजुसाब दुखासा साह (३४) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यप्राशन करत असाताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 24/Oct/2024














