sangameshwar : किरबेट येथील भाजलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी : किरबेट लाखणवाडी (ता. संगमेश्वर) येथील महिला घरात चुलीवर जेवण करत असताना साडीच्या पदराने पेट घेऊन भाजल्या. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

अधिक उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अक्षता संतोष अंकुशराव (वय ४७, रा. लाखणवाडी, किरबेट, ता. संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे. अक्षता या १ ऑक्टोबला रात्री घरी चुलीवर जेवण करत असताना अचानक त्यांच्या साडीने पेट घेतल्याने त्या भाजल्या होती. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्यांना सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 29/Oct/2025