Ratnagiri : जयगड बौद्धवाडीतील महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड-पेठ बौद्धवाडी येथील महिलेला बेशुद्धावस्थेत अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अलका तानाजी सोवळे (वय ४४, रा. पेठ बौद्धवाडी, जयगड, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास सीपीआर कोल्हापूर येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलका सोवळे हिला ११ ऑक्टोबरला रात्री अचानक डोके दुखून उलट्या येऊन बेशुद्ध झाली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 29/Oct/2025