रत्नागिरीत दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. मात्र नऊजणांनी २० अर्ज घेतले असून त्यात बाळ माने व उदय सामंत यांच्या नावे प्रत्येकी ४ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मंगळवार २२ पासून अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली असून पहिल्या दिवशी तीनजणांनी सात उमेदवारी अर्ज घेऊन गेले. यामध्ये सुरेंद्रनाथ तथा बाळ माने यांच्यासाठी मिहीर माने यांनी ४ अर्ज घेतले. तर मयूर निकम १ आणि पर्शुराम खेत्री यांनी २ अर्ज नेले होते.

दुसऱ्या दिवशी २३ रोजी विवेक गोगटे यांनी १, तन्मय अळेकर यांनी संजय यादव यांच्यासाठी ४, अॅड. अभिलाष पिलणकर यांनी मनसेचे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्यासाठी १, इरफान होडेकर यांनी कैस फणसोपकर यांच्यासाठी २, महेंद्र मांडवकर यांनी स्वतःसाठी एक तर महेश सामंत यांनी विद्यमान आमदार उदय सामंत यांच्यासाठी ४ अर्ज घेतले आहेत.

यातील एकाही उमेदवाराने आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे गुरुवारी आणखी काही व्यक्ती उमेदवारी अर्ज घेणार आहेत. सध्या ९ जणांनी २० अर्ज घेतले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 24-10-2024