चिपळूण : चिपळूण येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून द्या, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिरगाव येथील सुरजराव शिंदे यांनी केली आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध होणे का महत्त्वाचे आहे, हे संबंधितांना त्यांनी पटवून दिले आणि या विषयीचे निवेदनही सादर केले.
चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भाग हा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात शहरीकरणाकडे वाटचाल करत आहे. त्याचबरोबर अवतीभोवती गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढत आहे. सध्या प्रगत युगात गुन्हेगार नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंबन करत आहेत, तसेच चिपळूण येथून दोन महामार्ग जात असल्याने पोलिस प्रशासनावरचा कामाचा ताणही वाढत आहे. चिपळूण उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिली तर भौतिक, रासायनिक, जैविक आणि डिजिटल पुरावे घटनास्थळावरच उपलब्ध करून देणे शक्य होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 29/Oct/2025










