रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी-भंडारवाडी येथील झोपडीमागे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या महिले विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.४५ वा. करण्यात आली. संशयित महिले विरोधात पोलिस हेड कॅन्स्टेबल महेश कुबडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी ही महिला गावखडी भंडारवाडी येथील एका झोपडी मागे ९०० रुपयांची ९ लिटर गावठी दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. तिच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 24/Oct/2024














