Lanja : रुण येथे ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव

लांजा : तालुक्यातील रुण येथील श्री अचलेश्वर व श्री भैरी देवांचा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव दिनांक ५ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. रुण गावचे ग्रामदैवत श्री देव अचलेश्वर आणि श्री भैरी देवांचा त्रिपुराई पौर्णिमा उत्सवानिमित्त दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता देवाला रूपे लावणे, दहा वाजता अभिषेक, महाआरती आणि तीर्थप्रसाद. दुपारी २ वाजता पूजा ओटी भरणे कार्यक्रम आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजता तुलसी विवाह आणि त्रिपुरोत्सव सोहळा (त्रिपुर पेटवणे) साजरा करण्यात येईल.

रात्री ८ ते १० या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. रात्री दहा वाजता माऊली महिला नमन मंडळ, रत्नागिरी यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले महिलांनी सादर केलेली चौरंगी नमनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रूण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 29/Oct/2025