Ratnagiri RTO : दिवाळीतील वाहन नोंदणीत रत्नागिरी आरटीओला ७ कोटींचे उत्पन्न !

रत्नागिरी : जीएसटीचे दर कमी केल्यामुळे दसऱ्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर रत्नागिरीकरांनी वाहन खरेदीसाठी मोठा उत्साह दाखवला. दिवाळी पाडवा हा साडेतीनपैकी एक असलेल्या मुहूर्तावर रत्नागिरीकरांनी हजारो वाहनांची खरेदी केली आहे. उपप्रादेशिक रत्नागिरी विभागात एकूण २ हजार ५० वाहनांची नोंदणी झाली असून, त्यातून ७ कोटी ३३ लाख ४९ हजार ९२८ इतका शासकीय महसूल आरटीओ कार्यालयास प्राप्त झाला आहे.

सरकारने जीएसटीचे दर कमी केल्यानंतर दसरा सणात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकीसह विविध वाहने खरेदी केली. त्यामुळे आरटीओ विभागास वाहन नोंदणीतून ५ कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले. त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर रत्नागिरीकरांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पूजा करून रत्नागिरीकरांनी वाहन घरी नेले. दरम्यान, दसऱ्यानंतर दिवाळीत ही नागरिकांना वाहने वेळेत मिळावी म्हणून वाहनांची नोंदणीकरण्यासाठी रत्नागिरी आरटीओ विभागाने योग्य नियोजन केले. तब्बल २ हजार ५० वाहनांची नोंदणी झाली असून त्यातून ७ कोटी ३३ लाख ४९ हजार ९२८ इतका शासकीय महसूल प्राप्त झाला तर त्यापैकी ७कोटी ४ लाख ४७ हजार ९२८ नोंदणी शुल्क व करातून प्राप्त झाले असून २७४ वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकातून २८ लाख ९३ हजार इतकी रक्कम शासन जमा झाली आहे.

दसरा, दिवाळीत वाहन नोंदणीतून १२ कोटींचे उत्पन्न
दसरा अणि दिवाळीच्या मुहूर्तावर रत्नागिरीकरांनी मोठ्या प्रमाणात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी गाड्या खरेदी केल्या आहेत. दसरा मुहूर्तावर १३२९ तर दिवाळीच्या मुहूर्तावर २०५० असे एकूण ३ हजार ३७९ वाहनांची नोंदणी झाली असून, त्यातून उपप्रादेशिक परिवहन रत्नागिरी विभागाला तब्बल १२ कोटींहून अधिक शासकीय महसूल मिळाला आहे.

दसऱ्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी, चारचाकीसह अशा विविध २०५० वाहनांची नोंदणी झाली आहे. वाहन नोंदणी वेळेत व्हावी, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. यातून ७ कोटी ३३ लाख ४९ हजार ९२८ इतका महसूल प्राप्त झाला आहे, तर २७४ वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी शुल्कातून २९ लाखांचा महसूल मिळाला आहे-राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 29/Oct/2025