राजापुरात आज तीन उमेदवार अर्ज भरणार

राजापूर : विधानसभा निवडणुकीसाठी राजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेले शिवसेनेचे नेते (शिंदे गट) किरण सामंत, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (ठाकरे गट) विद्यमान आमदार डॉ. राजन साळवी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आजउद्या (ता. २४) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

ढोल-ताशांच्या गजरामध्ये रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. राजापूरमध्ये दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून शिवसेनेचे नेते किरण सामंत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. आज (ता. २४) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेले शिवसेनेकडून (ठाकरे गट) विद्यमान आमदार साळवी आणि काँग्रेसकडून लाड निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. ते उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 24-10-2024