मंडणगड : मंडणगड शहरातील आर. के. रेस्टो. हॉटेलमध्ये कढईतील तेलाचा भडका उडाल्याने सिलेंडरच्या रेग्युलेटर जळून स्फोट होऊन काही आग लागल्याची घटना बुधवार दि. २३ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवळपासच्या दुकानदारांनी तत्काळ मदतकार्य केल्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यास मदत झाली. दरम्यान यादुर्घटनेत हॉटेल मधील एका कर्मचाऱ्यास दुखापत झाली असून, कोणतीही जीवित अथवा मोठी वित्तहानी झाली नाही.
आर. के. रेस्टो. हॉटेल हे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नेहमीच गजबजलेले असते. बुधवारी सायंकाळी हॉटेल मधील कर्मचारी किचनमध्ये काम करत असताना अचानक कढईतील तेलाने पेट घेतला. आगीच्या भडक्यामुळे सिलेंडरच्या पाईप व रेग्युलेटरने पेट घेतला. रेग्युलेटर उडाल्यान स्फोट झाल्याचा आवाज सर्वत्र झाल्याने आसपासच्या दुकानदारांनी तत्काळ आग नियंत्रणात आणण्यासाठी मदतकार्य सुरू केले. या घटनेचा उशिरापर्यंत पंचनामा झाला नव्हता. मात्र रहदारीच्या व गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत थोडक्यात नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने सर्वानीच सुटकेचा निःश्वास सोडला. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रुपेश साळुंखे, राहुल खांबे, साईराज सावंत, कौस्तुभ भिंगार्डे व जवळपासच्या दुकानदार व्यापाऱ्यांनी मदकार्य करण्यास पुढाकार घेतला. यावेळी एच. पी. गॅस एजन्सीचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य केले.
दुर्घटनेनंतर अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुर्घटनाग्रस्त आर. के. रेस्टो. हॉटेल हे रहदारीच्या टिकाणी व नगरपंचायत कार्यालयाच्या अगदीनजीक आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी शहरातील मुख्य चौकातील दुकानाला आग लागून हे दुकान पूर्णपणे खाक झाले होते. शहरात नगरपंचायत कार्यरत असून, अग्निशमन यंत्रणा नसल्याने नगरपंचायतीच्या कारभाराबाबत सर्वानीच यावेळी प्रश्न उपस्थित केला. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 24/Oct/2024














