खेड : तालुक्यातील रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये ‘महाराजा प्रतिष्ठान’ खेड व रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ रोजी सकाळी १० ते ५ या कालावधीत शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर?’ या विषयावरचे व्याख्यान असणार आहे. या प्रदर्शनात छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची ओळख छायाचित्रांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्या काळात प्रचलित असलेली शिवराई ही नाणी या प्रदर्शनात पहायला मिळतील. मोडी लिपीतून लिहिलेली पत्र व त्यांनी वापरलेले शिक्के व ठसे यांच्या प्रतिकृती पाहायला मिळणार आहेत. तसेच त्या काळात वापरात असलेल्या मराठा तलवारी, भाले, ढाल, पट्टा, खंजिर, कट्यार ही शस्त्रे व त्यांची माहिती या प्रदर्शनात पाहता येणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 24-10-2024














