रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून नितीन शंकर पवार (वय ३५, रा. हमरापूर, पेण, जिल्हा रायगड) गेल्या शनिवारी, दि. २५ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध अजूनही सुरू आहे.नितीन पवार आपल्या कुटुंबासोबत गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आले होते.

समुद्रस्नानासाठी गेले असताना ते लाटांच्या प्रवाहात ओढले गेले आणि त्यानंतर त्यांचा बेपत्ता झाले.

या घटनेनंतर जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलिस चौकीचे कर्मचारी, जीवरक्षक, ग्रामरक्षक दल, पोलिस पाटील आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. गणपतीपुळे, भंडारपुळे, मालगुंड, वरवडे, रीळ आणि उंडी परिसरापर्यंत म्हणजेच सुमारे २० किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यावर शोधकार्य सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:31 30-10-2025