रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने भारतारचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उहेश भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी दिलेल्या अमुल्य योगदानाला अभिवादन करणे तसेच राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य व सामुहिक शक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचवणे हा आहे.
या एकता दौडचे ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वा. पोलिस परेड मैदान, रत्नागिरी येथून प्रारंभ होऊन दौडीचा शुभारंभ जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याहस्ते होणार आहे. दौडमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार, विविध शासकिय कार्यालयातील अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दौडीचा मार्ग पोलिस परेड मैदान, जेड रोड चौक, जयस्तंभ, भाट्ये ब्रिज, भाट्ये समुद्र किनारा व त्याच मार्गे पुन्हा पोलिस परेड मैदान अशी होणार आहे. या दौड दरम्यान वैद्यकिय सहाय्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वाहतुक नियंत्रणासाठी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. रत्नागिरी पोलिस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून राष्ट्रीय ऐक्य, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश दृढ करावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 30/Oct/2025














