रत्नागिरी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असतानाही जमाव गोळा करुन सभा घेतल्याप्ररकणी राष्ट्रीय हिंदू राष्ट्र सेना अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह अन्य चार जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवार २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पतीत पावन मंदिरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रशासनाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही या सभेचे आयोजन केल्याप्रकरणी मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 24-10-2024














