रत्नागिरी : राज्य धनुर्विद्या असोसिएशन आयोजित राज्य सबज्युनियर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा हिंगोली येथे ८ ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
राज्य स्पर्धा कंपाउंड, रिकर्व व इंडियन या तीन प्रकारांत घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या अनुषंगाने शनिवारी (ता. १) रत्नागिरीत जिल्हा निवड चाचणीचे आयोजन केले आहे. यामध्ये १७ वर्षे वयोगटासाठी १ जानेवारी २००८ नंतर जन्मलेली मुले व मुली सहभागी होऊ शकतील. या जिल्हास्तरीय स्पर्धा रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होणार आहेत.
या चाचणीसाठी पात्र खेळाडूंनी क्रीडाप्रकाराचे साहित्य व वयाच्या मूळ दाखल्यासह सकाळी नऊ वाजता उपस्थित राहावे. निवड चाचणीमधून रत्नागिरी जिल्हा संघाची निवड केली जाईल. कमीत कमी ४ खेळाडूंचा सहभाग असेल तर गटातील प्रथम ३ क्रमांकांना मेडल दिली जातील. जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा तिरंदाजी असोसिएशनच्या सचिव समिधा झोरे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मार्तंड झोरे, समिधा झोरे यांच्याशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 30/Oct/2025














