रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ महिला बॅडमिंटन संघात गोगटे जोगळेकरच्या श्रुती फणसेची निवड

रत्नागिरी : शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या श्रुती माधव फणसे या विद्यार्थिनीची पश्चिम विभागीय अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ महिला संघात निवड झाली आहे.

२१ ऑक्टोबर २०२४ रोजी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई विद्यापीठ महिला बॅडमिंटन संघ निवड चाचणी मुंबई विद्यापीठ क्रीडा विभाग मरीन लाईन्स येथे घेण्यात आली होती.

९ ते १३ नोव्हेंबर २०२४ रोजी जगदीश प्रसाद झाबरमल तीब्रेवाला विद्यापीठ, चौदेला, झुनझुनु (राजस्थान) विद्यापीठ येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय महिला बॅडमिंटन स्पर्धेसाठी श्रुती फणसे (एमए भाग १- अर्थशास्त्र) या विद्यार्थिनीची विद्यापीठ मुंबई महिला बॅडमिंटन संघात निवड झाली आहे.

श्रुती फणसे या विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, वडील माधव फणसे आणि आई अंजली फणसे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विभाग प्रमुख डॉ. रामा अच्युता सरतापे यांचे सहकार्य लाभले.

श्रुती हिला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी अर्थशास्त्र विभागाचे शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 24/Oct/2024