राजापूर : राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील एका चायनीज सेंटर’ येथे बिलाच्या कारणावरून वाद होऊन जमाव करूनगोंधळ घालणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या पाच आरोपींविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुबारक इमाम फरास (वय ३४, रा. पाचल, मुस्लिमवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९ (२), १९१(२), ११५ (२), ३५२, ३५१(२), १३१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास पाचल बाजारपेठेतील ‘मैत्री चायनीज सेंटर’ येथे घडली.
फिर्यादी मुबारक फरास हे कॅश काउंटरवर बसलेले असताना, श्रवण संतोष तेलंग, महेश चंद्रकांत सुतार, सयेश एकनाथ सुतार, सूरज राजेंद्र गुरव आणि अमोल गोविंद गुरव हे मद्यपान करून आले होते. त्यांनी चायनीजचे बिल एवढे कसे झाले, अशी विचारणा करून वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी श्रवण तेलंग (वय २१, रा. पाचल, पेठवाडी), महेश सुतार (३५, रा. मूर, सुतारवाडी), सयेश सुतार (२७, रा. मूर सुतारवाडी), सूरज गुरव (२५, रा. तळवडे गुरववाडी) आणि अमोल गुरव (२५, रा. तळवडे गुरववाडी) या पाच जणांनी जमाव करून गोंधळ घातला. आणि दंगा केला. त्यावेळी शिवीगाळ करण्यात आली. शिवाय धमकावाल्याचे फिर्यादीने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत पुढील कारवाई सुरू होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 30/Oct/2025









