Ratnagiri : रत्नागिरी शहरात मोकाट जनावरांचा ठिय्या

रत्नागिरी : शहरात मोकाट जनावरे व कुत्रे यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने पावले उचलली होती. जनावरांचे पुनर्वसन चंपक मैदान येथे करण्यात आले होते; मात्र पावसाळा कमी झाल्यानंतर पुन्हा शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. मंगळवारी (ता. २८) मोकाट जनावरे चक्क जयस्तंभ ते अगदी साळवीस्टॉपपर्यंत वाहनचालकांसाठी स्पीडब्रेकर ठरले.

मंगळवारी शहरातील जयस्तंभ, माळनाका, मारूतीमंदिर, आरोग्य मंदिर, शिवाजीनगर ते साळवीस्टॉपपर्यंत मोकाट गुरे टप्प्याटप्प्याने बसली होती. शहराच्या मुख्य रस्त्यावर बसलेली गुरे चक्क वाहनचालकांसाठी स्पीडब्रेकरचे काम करत होती. शिवाजीनगर, आरोग्य मंदिर, मारुती मंदिर, माळनाका आणि साळवीस्टॉप येथे मोकाट गुरांनी रस्ता अडवून धरला होता. चालकांना वाहन चालवण्याची कसरत करावी लागत होती. मोकाट गुरांचा हा प्रश्न सध्या शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनचालकांना सतावत आहे. बाजारपेठेत फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा अद्यापही बंदोबस्त झालेला नाही. शहरालगतच्या सर्व ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोकाट गुरे ठिय्या देऊन बसलेली दिसत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 30/Oct/2025