रत्नागिरी : शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जड साहित्याची दरपत्रक पद्धतीने विक्री करावयाची आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपले दरपत्रक १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात पाठवावीत, असे आवाहन शासकीय तांत्रिक विद्यालय तथा कनिष्ठ विद्यालय राजिवडाचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.
निविदेच्या बंद लिफाफ्यावर स्वच्छ अक्षरात लॉट घेणाऱ्याचे नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. निविदा १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वा. उघडण्यात येणार आहे. विक्री करावयाचे निर्लेखित जडसंग्रह साहित्य या कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून ६ नोव्हेंबरपासून कार्यालयीन वेळेत १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाहता येईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 30/Oct/2025














