बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरु झाल्यापासूनच चर्चेत आहे. यावेळी महेश मांजरेकर यांच्या जागी रितेश देशमुख होस्ट असल्याने प्रेक्षक उत्सुक होते. बिग बॉस हा गेम १०० दिवसांचा असतो हे सगळ्यांनाच माहित आहे.
बिग बॉसचे पहिले चारही पर्व १०० दिवसांचे होते. पण आता पाचवा सीझन केवळ ७० दिवसातच गाशा गुंडाळत आहे हे आता कन्फर्म झालं आहे.
कलर्स मराठीवरील लोकप्रिय बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन १०० नव्हे तर ७० दिवसातच निरोप घेतोय. चॅनलकडून हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. चॅनलच्या वरिष्ठ अधिकारी सुगंधा लोणीकर यांनी ही माहिती कन्फर्म केली आहे. लोकमत फिल्मीशी बोलताना त्या म्हणाल्या, ” होय. बिग बॉस ७० दिवसातच निरोप घेणार आहे. हा अचानक घेतलेला निर्णय आहे. याची कल्पना कोणालाच नव्हती. स्पर्धकांनाही आजच्या एपिसोडमध्ये ही माहिती देण्यात येणार आहे. तसंच शो इतक्या लवकर आटोपता घेण्याचं कारण लवकरच जाहीर करण्यात येईल.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:18 23-09-2024