खेड : तालुक्यातील मोरवंडे-बोरज येथे ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वाद संस्कृती महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या आकर्षक भेटवस्तू, फराळ, अगरबत्ती, उटणे, कंदील, तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थाची विक्री असे विविध स्टॉल लावण्यात आले होते. या महोत्सवात सर्व विद्यार्थी, पालकवर्ग, शिक्षक यांनी सहभाग घेतला. प्रशालेचे विद्यार्थी शिक्षक पालकवर्ग यांनी वेगवेगळ्या फराळाचा आस्वाद घेतला व वस्तूंची खरेदी केली. कार्यक्रम यशस्वीपणे होण्यासाठी प्राचार्य भरत मोरे तसेच ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. यावेळी राजेश किट्टद, प्राथमिक विभाग प्रमुख शर्वरी शिर्के, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 24/Oct/2024














