खेड जेसीआयकडून पोलिस स्मृतिदिन कार्यक्रम

खेड : जेसीआय खेडकडून पोलिस दलामध्ये कार्य करत असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, म्हणून खेड पोलिस आणि जेसीआय खेड यांच्याकडून खेड पोलीस स्टेशन येथे आदरांजली कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी पोलिस निरिक्षक नितीन भोयर खेड जेसीआय अध्यक्ष जेसी संकेत आपिस्टे, सेक्रेटरी अमर दळवी, माजी अध्यक्ष दीपक नलावडे, प्रमोद कांबळे, गणेश राऊत, प्रथमेश खामकर, खजिनदार स्वप्निल कदम, सदस्य चैतन्य सकपाळ, अमित गरूड, मधुर पेठे, कपिल कोळेकर आणि सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 24/Oct/2024