रत्नागिरीत त्रिरत्न बौद्ध महासंघाचे ३१ ऑक्टोबरपासून धम्मशिबिर

गणपतीपुळे : त्रिरत्न बौद्ध महासंघ रत्नागिरी यांच्या वतीने गुरुवार ३१ ऑक्टोबर ते रविवार ३ नोव्हेंबर या कालावधीत निवासी धम्मशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे नेतृत्व धम्मचारी यशोरत्न (पुणे) हे करणार आहेत. तर त्यांच्यासमवेत धम्मचारी श्वेतकेतू (पोचरी), धम्मचारी सत्यरत्न (फणसवळे), धम्मचारी सत्यसागर (पानवल), धम्मचारी सुनंदक (करबुडे), धम्मचारी शीलनंदक (आंबेशेत) आदी धम्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. हे शिविर रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी, साळवी स्टॉप रत्नागिरी येथे होणार असून ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वा. सुरू होणार आहे. या शिबिराच्या माहितीसाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ रत्नागिरीचे धम्ममित्र सुनंदक, रविकांत पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 24/Oct/2024