Maharashtra Navnirman Sena : चिपळुणात मनसेची आढावा बैठक

चिपळूण : शहरातील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चिपळूण तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी संघटना बांधणीसह विविध विषयांवर चर्चाकरण्यात आली. मनेसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवलकर, गुहागर विधानसभा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, चिपळूण तालुकाध्यक्ष विश्वनाथ डोळस यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली.

बैठकीमध्ये पक्ष संघटना बांधणी, नवीन नियुक्ती, पक्षप्रवेश, गावागावामध्ये संघटना उभी करणे, जि. प. व पंचायत समिती गण व गटनुसार नियुक्ती व सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाकडून पडलेल्या आरक्षण नुसार इच्छुक उमेदवार यांचा आढावा घेण्यात आला. तसेच चिपळूण शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीविषयी १४ प्रभागातील इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत याची चाचपणी करण्यात आली.

यावेळी चिपळूण तालुक्यातील वहाळ, उमरोली, सावर्डे, अलोरे, शिरगाव, मालदोली, कळवंडे, पेढे, खेर्डी या जि.प. गटामध्ये व पंचायत समिती गण मध्ये उमेदवार उभे करण्याबाबत नियोजन झाले आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना आपआपल्या भागात काम करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

बैठकीवेळी गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खेतले, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष उमेश लटके, चिपळूण उपतालुका अध्यक्ष संतोष हातिस्कर, रवींद्र जाधव, नरेश निवळकर, चिपळूण तालुका प्रसारमाध्यम प्रमुख सूरज घाग आणि सर्व विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 01/Nov/2025