देवरुख : स्वयंपूर्तता फाऊंडेशनतर्फे संगमेश्वरातील ५० हजार विद्यार्थी व ग्रामस्थांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यात ७० टक्के पुरुष व ८० टक्के महिलांचे हिमोग्लोबिन कमी मिळून आल्याची धक्कादायक माहिती फाऊंडेशनच्या दीपिका रांबाडे यांनी दिली आहे.
गुजरात येथील श्रीमद रामचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व स्वयंपूर्तता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अॅनिमिया (हिमोग्लोबिन) तपासणी संगमेश्वर तालुक्यात करण्यात आली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या सर्वेनुसार देशात ७० टक्के जनता अॅनिमियाग्रस्त असल्याचे जाहीर केले आहे.
विद्यार्थी दशेतील मुलांमध्येच हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत असल्याने, फाऊंडेशनने शालेय विद्यार्थ्यांची तपासणी मोहीम हाती घेतली. विद्यार्थी शाळेत प्रार्थना वा मैदानावर खेळासाठी उपस्थित राहिल्यावर काही वेळातच बहुतांश मुलेही चक्कर येऊन पडण्याचे प्रकार दिसून येतात. हा प्रकार केवळ हिमोग्लोबिन कमी असल्याने घडतो.
यामुळे शालेय विद्यार्थ्यांची तपासणी प्रकर्षाने हाती घेण्यात आली. गेली तीन महिने हे फाऊंडेशन तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयात ही शिबिरे घेत आहेत. यातच शासकीय कार्यालये, यात्रा व सार्वजनिक उत्सव याठिकाणीदेखील या फाऊंडेशनच्या वतीने हिमोग्लोबिन तपासणीची पूर्ण केली. फाऊंडेशनने या तपासणीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणाऱ्या प्रत्येक महिला व पुरुषांना तसेच विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचा औषधांचा पुरवठा केला आहे.
तपासणीत हिमोग्लोबिन वाढलेले मिळून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तालुक्याची अॅनिमियाची आकडेवारी खुद्द जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी जाहीर केले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 03/Nov/2025














