रत्नागिरी : एसटीच्या मद्यपी कर्मचाऱ्यांना पकडण्यासाठी राज्यभरात एकाचवेळी एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्यांकडून विशेष तपासणी मोहीम घेण्यात आली. यामध्ये दीड हजारांहून अधिक संशयित कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात ७ जणांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे आता एसटीचे चालक-वाहक इतर कर्मचारी वाँच ठेवण्यासाठी भविष्यात येणाऱ्या एसटी बसेसमध्ये चालकाच्या समोर ब्रेथ अॅनालिसिस यंत्र (अल्कोहोल तपासणीसाठी) बसविण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या मद्यपी कर्मचाऱ्यांचा अटकाव होणार आहे.
एसटी ही गोरगरीब प्रवाशांची वरदायिनी म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो प्रवासी लालपरीतून प्रवास करीत असतात. वाट पाहीन मात्र लालपरीनेच प्रवास करणार म्हणून लाखो प्रवासी एसटीतून प्रवास करीत आहेत, मात्र, काही एसटी कर्मचारी कर्तव्यावर असताना दारू पिऊन एसटी चालवत आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचे जीव धोक्यात घालत असतात, असे कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले ही दिसून आले. मोठ्या प्रमाणात चालक- वाहकांची तक्रार आल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने मद्यपी कर्मचाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी अचानक कोणालाही न सांगता एसटीच्या सुरक्षा, दक्षता खात्यांकडून रत्नागिरीसह नाशिक, परभणी, नांदेड, धुळे, भंडारा यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यात संशयित चालक, वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांची तपासणी मोहीम घेण्यात आली. यामध्ये सात कर्मचाऱ्यांवर निलंबित कारवाई करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षा ही एसटी महामंडळाची प्राथमिकता असल्यामुळे भविष्यात नवीन येणाऱ्या बसेसमध्ये बालकाच्या समोर ब्रेथ अॅनालिसिस (यंत्र अल्कोहोल तपासणीसाठी बसवण्यात येणार आहे. त्यामुळे चालक, वाहकासह इतर कर्मचाऱ्यांवर चाप बसणार एवढं मात्र निश्चिंत
जिल्हाबाहेर, जिल्हातंर्गत तपासणी आवश्यकच
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाबाहेर एसटी बस घेवून जाणारे चालक वाहकांची तपासणी होणे आवश्यकच आहे. दररोज नोकरदार, व्यापारी, शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करीत असतात. येथील रस्ते चढ-उतार, घाट आहेत. त्यामुळे चालक वाहक मद्यपी पिणारा असल्यास धोकादायक आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्या जाऊ शकतो. रत्नागिरी विभागातील जिल्हाबाहेर, जिल्हांतर्गत असणाऱ्या चालक-वाहकांची तपासणी दरवर्षी आवश्यक असल्याची चर्चा प्रवाशांमधून होत आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या वतीने चांगला निर्णय घेतलेला आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावरील सर्रास चालक वाहक मद्य घेत असून प्रवाशांनी तक्रार करूनसुद्धा कारवाई होत नाही. मद्य पिऊन गाडी बालवल्यास हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशांची तपासणी मोहिम वर्षभर सुरूच असली पाहिजे. तक्रारीवरून कारवाई होणे अपेक्षित आहे. नवीन एसटी बसेसमध्ये ब्रेथ अॅनालिसिस बसवण्याचे निर्णयाचे स्वागतच आहे. –प्रवीण शिंदे,प्रवासी
रत्नागिरी विभागात ही सुरक्षा व दक्षता समितीच्या बतीने एसटीतील चालक, बाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांची तपासणी झालेली आहे. विभागात कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नसून तसा रिपोर्ट ही नाही. –प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 PM 03/Nov/2025














