रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात महिन्यात बांबू लागवड सुरू झाली असून यंदाच्या वर्षी २०२५-२६ वर्षासाठी ४५० हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट आहे. आजअखेर जिल्ह्यात केवळ ७०.४३ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड झाली असून सर्वाधिक बांबू लागवड राजापुरात झाली आहे, तर रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर, लांजा तालुक्यात अद्याप बांबू लागवडच झालेली नाही. सततच्या पावसामुळे यासह विविध कारणांमुळे जिल्ह्यात संथगतीने बांबू लागवड सुरू असल्याचे चित्र आहे.
पडीक जमीन, शेताचे बांध, माळरानावर दलदलीच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी म्हणून विविध विभागांनी मेहनत घेतली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ही योजनांतर्गत यंदा २०२५-२६ वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ४५० हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ७०.४३ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड झालेली आहे. रत्नगिरी जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीच्या माध्यमातून सक्षम व शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने बांबू लागवड सुरू आहे. बांबू इतर सर्व झाडांपेक्षा जास्तप्रमाणात हवेतील कार्बन शोषते आणि ऑक्सीजन देते.
त्यामुळे बांबू हा ग्लोबल वॉथर्मगवर एक उत्तम उपाय ठरू शकतो. त्यामुळे बांबूची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांचा संथच प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबूची शेती करावी, सोबत अनुदान घ्यावे असेही आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ७१.४३ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात आली आहे. ही आकडेवारी केवळ कृषी विभागाची असून जिल्हा परिषदेची आकडेवारी समाविष्ट केल्यास आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे. सर्वाधिक बांबू लागवड राजापुरात झाली आहे-शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 03/Nov/2025














