Ratnagiri : करबुडेतील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : घरी अचानकपणे चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना २६ ऑक्टोबरला दुपारी घडली. गणपत गुणा वेदरे (वय ७१, रा. करबुडे कोंड वेदरेवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी ते करबुडे येथील राहत्या घरी येऊन बेशुद्ध पडले होते. त्यांना उपचारांसाठी प्रथम जाकादेवी येथील खासगी डॉक्टरकडे दाखल केले. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय व अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 03/Nov/2025