Shekhar Nikam |कोकणात भातशेतीचे मोठे नुकसान : आमदार शेखर निकम

चिपळूण : कोकणात गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या पाऊस, वादळामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेले भातपीक पावसाने भिजून आडवे पडले असून, अनेक ठिकाणी पिकांना पुन्हा कोंब फुटले आहेत. त्यामुळे मराठवाडा विदर्भाप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, शेतकरी चिंतेत आहे. भातपीक हे येथील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. यावर्षीची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, शासनाने तातडीने या परिस्थितीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व कोकणातील तालुक्यांमध्ये तातडीने पंचनामे करावेत. मराठवाडा व विदर्भातील अतिवृष्टीत शेतकऱ्यांना जशी शासनाने मदत केली त्याच धर्तीवर कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार निकम यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 03/Nov/2025