Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरातील अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे दाना चक्रीवादळात रूपांतर

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे तसेच दाना चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आज काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात असलेले अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आज सकाळी साडेपाचच्या सुमारास दाना या चक्रीवादळात निर्माण झाले आहे. हे चक्रीवादळ पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर १६.५ डिग्री उत्तर अक्षांश तर ८९.६ डिग्री पूर्व रेखांशावर स्थित आहे. आज सकाळी वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरम्यान, आज (२४ ऑक्टोबर) रोजी राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या चारही उपविभागांमध्ये आज (२४ ऑक्टोबर) रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात आज काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात सुद्धा आजपासून तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

त्यानंतर मात्र, पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आज मेघगर्जना व विजांच्या कडकडाट होऊन ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

शेतकरी बांधवांनी काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, मळणी केलेल्या सोयाबीनची उन्हात वाळवूनच साठवणूक करावी.

रब्बी हंगामात ब्रोकोली, टोमॅटो, फुल कोबी व पत्ता कोबी या भाजीपाला पिकांचे गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे तर मुळा, गाजर, मेथी व पालक आदी पिकाची लागवड करून घ्यावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 24-10-2024