गुहागर : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेले निरामय रुग्णालय सुरू करण्यासाठी अंजनवेल बोरभाटले कातळवाडी ग्रामस्थ मंडळाचे सरचिटणीस यशवंत बाईत यांनी केली आहे. या बाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री व मत्स्यविकास मंत्र्यांना दिले आहे.
रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि.चा वीजनिर्मिती प्रकल्प आणि कोकण एल. एन. जी. लि.चा गॅस प्रकल्प ज्या जमिनींवर उभे आहेत ती अंजनवेल-कातळवाडी, जमिन वेलदूर-घरटवाडी व रानवी (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथील शेतकऱ्यांची महाराष्ट्र शासनाने १९९४ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अंतर्गत त्यावेळच्या एन्रॉनच्या दाभोळ वीज प्रकल्पासाठी संपादित केली तीच आहे. याच जमिनींचा संपादनाच्या विषयात मुंबई उच्च न्यायालयाने रिट पेटीशन नं. २७३५/९४ मधील आदेशात येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी व प्रकल्पग्रस्त जनता यांच्या आरोग्य सुविधांसाठी ५० बेडचे अध्ययावत रुग्णालय सुरू करण्याचे सांगितले होते.
येथील कंपनी बदलली परंतु जमीन तीच आहे व प्रकल्प तोच आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयातील रीट पेटिशन नं. २७३५/९४ मधील आदेश त्यावेळच्या दाभोळ वीज कंपनी आणि महाराष्ट्र शासनाला होता असला तरी आता प्रकल्प चालविणाऱ्या रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि. व कोकण एल. एन. जी. या कंपन्यांना व महाराष्ट्र शासनाला बंधनकारक आहे.
वरील वस्तुस्थितीला अनुसरुन निरामय रुग्णालय सुरू करून ते चालविण्यासाठी रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि. व कोकण एल. एन. जी ने निधी पुरविण्यासाठी निर्णय करण्यासाठी अंजनवेल मंडळाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी, आदेशाचा सन्मान करुन महाराष्ट्र शासनाने व दोन्ही कंपन्यांनी येथील प्रकल्पग्रस्त पंचक्रोशीतील जनतेच्या आरोग्य सुविधांसाठी निरामय रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 04/Nov/2025














