चिपळूण : चिपळूण शहराचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव जयंती उत्सवाचे उद्यापासून विविध कार्यक्रमांतर्गत आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ५ ते बुधवार दि. १३ नोव्हेंबर या कालावधीत जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शहराचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट अंतर्गत कालभैरव जयंती उत्सवाला बुधवार दि. ५ पासून त्रिपुरी पौर्णिमा दीपोत्सवाच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे. जन्मोत्सव कार्यक्रमांतर्गत दि. ५ रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत दीपोत्सव कार्यक्रमाचे जन्मोत्सवास सुरुवात होणार आहे. दि. ६ ते दि. १३ या कालावधीत सायंकाळी ५ ते ७ वा. शहरातील विविध भजनी मंडळांचे भजन होणार आहे. यामध्ये विश्वकर्मा प्रासादीक महिला संगीत भजन, जिवेश्वर महिला प्रासादीक भजन मंडळ, कालिकामाता, स्व. वामनराव साडविलकर संस्थापित स्वरदर्शन कलाकुंज मंडळाचा संगीत स्वरसुमनांजली, सोमवार दि. १० रोजी सकाळी ८ ते १२ वा. महासोमयाग समिती आणि कालभैरव सांस्कृतिक मंच यांच्या वतीने भैरवयाग, सायंकाळी स्वरसाधना महिला मंडळाचे भजन, सहेली ग्रुपचे संगीत भजन, दि. १२ रोजी कालभैरव जयंतीनिमित्त सकाळी १०: ३० ते १ वा. हभप रूपेशबुवा फडके यांचे जन्मोत्सव कीर्तन होईल.
दुपारी श्रींची पालखी सवाद्य गांधारेश्वर भेटीस जाईल. सायंकाळी स्वरदर्शन कलाकुंज प्रस्तुत स्वरसुमनांजली, पसायदान व गुरुवार दि. १३ रोजी दुपारी ११ ते २वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ७ वा. महिला मंडळाचे भजन, ६ ते ७:३० वा. श्रींची पालखी वेस मारूती भेटीस रवाना होईल व रात्री ९ ते १२:३० वा. हभप उदयबुवा फडके यांच्या लळीताच्या कीर्तनाने जन्मोत्सवाची सांगता होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 05/Nov/2025














