Accident : पानवल येथे डंपर अंगावरून गेल्याने एकजण गंभीर जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पानवल येथे डंपर अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वा. सुमारास घडली.

सोनू रामलाल हलवारी (३२, सध्या रा. खेडशी, रत्नागिरी) असे गंभिर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी सोनू हलवारी हा पानवल येथील रस्त्याने चालत जात असताना एका डंपरचे चाक त्याच्या डाव्या पायावरुन गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच जगतगुरू नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 05/Nov/2025