Tripurari Purnima 2025: 51 हजार दीपांनी कोल्हापुरातील पंचगंगा घाट उजळला!

कोल्हापुरात मंगळवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला. कोल्हापूरकरांनी तब्बल 51 हजार दीप पणत्या लावून घाट उजळून टाकला.

फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या आणि पारंपरिक सजावट यामुळे संपूर्ण घाट दैवी प्रकाशाने न्हाऊन निघाला.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून धर्म आणि सत्याचा विजय मिळवला, या आनंदात दिवे लावून ‘देवदिवाळी’ साजरी करण्याची परंपरा आहे.

कोल्हापुरात या दिवशी अंबाबाई मंदिर, पंचगंगा घाट आणि शहरातील विविध मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो.

आज पहाटे हजारो दीपांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर दैवी तेजाने झळाळून गेला.

हा सोहळा पाहण्यासाठी पहाटेपासूनच पंचगंगा नदी घाटावर कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 05-11-2025