रत्नागिरी : सोशल मीडियाच्या व्हॉटस्अॅपवर आलेली लिंक ओपन करून त्यामध्ये माहिती भरली असता भामट्याने बँक खात्यातून ९३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अजित सदानंद पिलणकर (वय ५०, रा. पुष्पेंद्र कॉम्प्लेक्स, शेरेनाका, झाडगाव-रत्नागिरी) असे ९३ हजारांची फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना २२ ते २५ सप्टेंबर २०२५ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रमाविष्ठ्ठल अपार्टमेंट, राधाकृष्ण टॉकीजसमोर, रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित पिलणकर २५ सप्टेंबरला सिनेमाच्या तिकीट बुकिंगबाबत माहिती घेत होते. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक ओपन करून माहिती भरली. त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यातून सुरुवातीला ८ हजार व त्यानंतर ८५ हजार असे एकूण ९३ हजार रुपये वळविले. या प्रकरणी अजित पिलणकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 05/Nov/2025














