कोकण किनारपट्टीत थंडीची प्रतीक्षा…

रत्नागिरी : अवकाळी पावसाने हैराण झालेल्या कोकण किनारपट्टी भागात आता गुलाबी थंडीची प्रतीक्षा सुरू झाली आहे. अवकाळी पाऊस थांबल्यानंतरच थंडीचे आगमन होणार आहे.

वादळी पावसाच्या निर्गमनावरच कोकणातील खरीपातील पिकस्थिती आणि आंब्याचा हंगाम अवलंबून आहे. त्यावरच आबा हंगामाची जळवाजुळव केली जाणार आहे. गेला आठवडाभर कोकण किनारपट्टी भागात परतीच्या वादळी पावसाचा मुक्काम आहे. ऑक्टोबर मध्यावर आला तरी अद्याप थंडीची चाहूल लागलेली नाही. उलट तापमानवाढीने नागरिक हैराण झाले आहेत. दीपावली जवळ आली तरी थंडी न पडल्याने आंबा बागायतदारांबरोबर शेतकऱ्यांची प्रतीक्षाही आता ताणली गेली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागात कमाल तापमान ३० ते ३१ अंशावर गेले आहे. गुरुवारी कमाल तापमान सकाळी १० वाजता ३१ अंशावर होते. तर दुपारी ते ३२ अंशावर झेपावले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:14 PM 24/Oct/2024