विकासाच्या माध्यमातूनच पक्षाची ताकद वाढते : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

खेड : जनतेच्या बदललेल्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी ठोस प्रयत्न करा, लोकांचा विश्वास संपादन करा. विकासाच्या माध्यमातूनच पक्षाची ताकद वाढते, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले.

खेड येथे बुधवारी आयोजित कार्यकर्ता संवाद व पक्षप्रवेश मेळावा कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. चव्हाण पुढे म्हणाले की, या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकाच विचारांचे सरकार आहे. विकासाचे धोरण राबवले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही या विचारांची शासन संस्था स्थापन व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

खेड शहरासह तालुक्यात सर्वत्र प्रमुख ठिकाणी स्वागत कमानी उभारून व भाजपचे झेंडे लाऊन मेळाव्याची वातावरण निर्मिती करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, डॉ. विनय नातू, उद्योजक प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, केदार साठे, भाऊ ईदाते, अल्पसंख्यांक सेल पदाधिकारी खालिद परकार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन वैभव खेडेकर यांनी केले.

या मेळाव्यात मनसेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच माजी नगरसेवक, गुहागर नगरपंचायतीतील सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्यांना स्वागत चिन्ह व पदाधिकारी नियुक्तीपत्रे देण्यात आली. या मेळाव्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी चंदी हवेली रिसॉर्टच्या सभागृहात पदाधिकारी व कार्यकत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 06/Nov/2025