मोठ्या उत्साहात किल्ले रायगडावर त्रिपुरा पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे.
हजारो मशाली.. पणत्या, फटाक्यांच्या आतिषबाजीत किल्ले रायगड उजळून निघाला आहे.
छत्रपती शिवाजी महारज की जय च्या घोषणेनं परिसर दणाणूल गेल्याचं पाहायला मिळालं.

त्रिपुरा पौर्णिमेला किल्ले रायगडच्या पायथ्याशी चित्त दरवाजा जवळ दीपोत्सव साजरा करण्यात आला.
या दीपोत्सवाला हजारो मशाली, पणत्या, आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आली.
मशाली, पणत्या, आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं किल्ले रायगड उजळून निघाला.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मावळा प्रतिष्ठानकडून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
त्यामुळे या दीपोत्सवाला किल्ले रायगडचा संपूर्ण परिसर प्रकाशमय झालेला बघायला मिळत आहे.
यावेळी किल्ले रायगडावर शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:25 06-11-2025














