रत्नागिरी : तालुक्यातील टिके भातडेवाडी येथून विवाहिता आपल्या दोन मुलांसह बेपत्ता झाली आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वा. घडली आहे. रेश्मा प्रकाश राठोड (वय ३५), मुलगा प्रथमेश प्रकाश राठोड (७) आणि राजेश प्रकाश राठोड (५, सर्व मुळ रा. विजापूर, कर्नाटक सध्या रा. टिके भातडेवाडी, गणेशनगर स्टॉपजवळ, रत्नागिरी) अशी बेपत्ता झालेल्या माय लेकरांची नावे आहेत.
याबाबत पती प्रकाश रुपसिंग राठोड (३८, मूळ रा. विजापूर, कर्नाटक, सध्या रा. रत्नागिरी) याने ३१ ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्याची पत्नी रेश्मा राठोड ही ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. घरात कोणालाही न सांगता आपल्या दोन मुलांसह निघून गेली. पती प्रकाशने तिचा आजुबाजुला शोध घेतला तसेच इतर नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु तिची कोठूनही माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत असून या तिघांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी ग्रामीण पोलिस ठाणे -९६८४७०८३१५, नियंत्रण कक्ष-०२३५२-२२२२२२ तसेच पोलिस हेड कॉन्स्टेबल बी. एन. कदम यांचा मोबाईल क्र ९४२२९०११२२ व संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 07/Nov/2025














