रत्नागिरी : जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक परवानग्या एकत्रित मिळाव्यात यासाठी नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये एक खिडकी राबवावी, तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा आणि भरारी पथक निर्माण करून तपासणी नाक्यांवर तैनात करावे, अशा सूचना या वेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिल्या.
जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जिंदल यांनी आज जिल्हास्तरीय संनियत्रण समितीची बैठक घेतली. बैठकीला पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, प्रांताधिकारी जीवन देसाई, आकाश लिगाडे, मुख्याधिकारी वैभव गारवे, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार, तहसीलदार प्रियांका ढोले, अमृता साबळे आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी या वेळी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. मतदान केंद्रांमध्ये किमान पायाभूत सुविधा असल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भर द्यावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 07/Nov/2025














