Marleshwar Temple : त्रिपुरारी पौर्णिमाला हजारो दिव्यांनी उजळले मार्लेश्वर

साडवली : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे परंपरेनुसार चालत आलेला त्रिपुरारी पौर्णिमाला उत्सव बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त लख्ख हजारो दिव्यांनी श्री क्षेत्र मार्लेश्वर उजळून निघाले होते.

या उत्सवाची सुरुवात देवस्थान कमिटी, पुजारी व मठपती जंगम स्वामी यांच्या उपस्थितीत टिपुराची विधीवत पूजा अर्चा करून परंपरेनुसार श्री देव मार्लेश्वराचे ३६० मानकऱ्यांना टिपूर कार्यक्रमाची साद घालण्यात आली. त्यानंतर सगळे दिवे पेटवून महाआरती झाली दरम्यान, याच दिवशी श्री देव मार्लेश्वराच्या अंगणात असलेले पवित्र तुळशी वृंदावन त्याचा परंपरेनुसार उपस्थित जनसमुदायाच्या साक्षीने तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला आणि आलेल्या सर्व भक्तगणांना महाप्रसाद देऊन उत्सवाची सांगता झाली.

या उत्सवाला श्री मार्लेश्वर देवस्थान ट्रस्ट-कमिटी, पुजारी, मारळ ग्रामस्थ व मान-मानकरी यांच्यासह भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 07/Nov/2025