Sangameshwar : संगमेश्वरात दोन गटांत झालेल्या वादात तरुणावर कोयतीने वार

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कुंडी या गावी घराच्या छपरावरील पत्र्याचे पाणी जाण्या-येण्याच्या पाखाडीवर पडते याबाबत विचारणा केली असता दोन गटांमध्ये वादावादी होऊन एका तरुणावर कोयतीने वार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या वादावादीत परस्पर विरोधी ६ जणांवर देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात सुनील दिलीप मांजरेकर हा तरुण जखमी झाला असून यातील जखमी तरुणाची तब्येत स्थिर आहे. गुरुवारी रात्री सुनील हा हातात लाकडी हिरका घेऊन आरोपी मनोहर वासुदेव खामकर यांना आमच्या विरोधात वारंवार तक्रारी का करतोस, अशी विचारणा करून त्यांच्या डोळ्याजवळ हिरक्याने मारले. ही घटना रात्री १० च्या दरम्यान घडली. यावेळी सुनील सोबत संतोष जयराम मांजरेकर, संजय देवजी मांजरेकर हे होते. याबाबत सुनील याने देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून या ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर मनोहर वासुदेव खामकर, भिकाजी धोंडू सावंत आणि विमल यांनी रात्री १.५० वाजता छपराच्या पाण्याबाबत विचारणा केली. फिर्यादी संतोष मांजरेकर याला जाब विचारला. उपस्थित सुनील दिलीप मांजरेकर याला धमकावले. मनोहर खामकर याने हातातून आणलेल्या कोयतीने सुनील याच्या डोक्यावर, खांद्यावर वार केले. यात सुनील जखमी झाला. या घटनेची फिर्याद संतोष मांजरेकर यांनी देवरुख पोलिस ठाण्यात दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 08/Nov/2025