पाचल : पाचल-जवळेथर रस्त्यातंर्गत तळवडे-राववाडी ते तळवडे ताम्हाणे फाटा दरम्यानचा रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर व आमदार किरण सामंत यांच्याकडे केली होती. याची दखल घेत आमदार सामंत व बांधकाम विभागाने या रस्त्याच्या डाबंरीकरणाला प्रारंभ केला आहे.
दुरुस्तीअभावी या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. अनेक ठिकाणी मोऱ्या खचल्या होत्या, तर दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्यादेखील गायब झाल्या होत्या. परिणामी जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभक संतापाची भावना निर्माण झाली होती. जनतेच्या होणाऱ्या या गैरसोयीबद्दल सुरेश गुडेकर यांनी याबाबत विविध प्रसार माध्यमांतून आवाज उठवला. आमदार किरण सामंत यांच्याशी संपर्क साधून निवेदन दिले. अखेर आमदार यांच्या प्रयत्नातून बांधकाम विभागाने तळवडे-राववाडी ते ताम्हाणे फाटा दरम्यान १७०० मीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरणासहित डाबंरीकरणाच्या कामाला प्रारंभ केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 08/Nov/2025














