Ratnagiri : मारुती मंदिर ते नाचणे मार्गावर वाहतुकीस अडथळा करणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर ते नाचणे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस लक्ष्मण निकम (वय २९, रा. बाजारपेठ सावर्डे, ता. चिपळूण) असे संशयित चालकाचे नाव आहे.

ही घटना गुरुवारी (ता. ६) सायंकाळी नाचणे रोडवर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित तेजस निकम यांनी मोटार रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशी उभी करून ठेवली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 08/Nov/2025