Vilas Rahate | विलास रहाटे यांनी साकारली छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभूंवरील रांगोळी

साडवली : राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालय (ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरूखचे रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी साकारलेल्या छत्रपती शिवराय व बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित रांगोळीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.

ही रांगोळी साकारण्यासाठी रहाटे यांना २२ तासांचा कालावधी लागला. आयोजकांनी या स्पर्धेसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिचित्र व त्यांच्या जीवनातील प्रसंग’ हा स्पर्धकांसाठी विषय दिला होता. स्पर्धेसाठी ३x४ फूट आकाराची रांगोळी साकारायची होती. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नामवंत ३० स्पर्धकांना आमंत्रित केले होते. रहाटे यांना द्वितीय क्रमांकासाठी रोख पारितोषिक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ प्रतिकृतीचे सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 08/Nov/2025