Chiplun : खेर्डीतील कॉजवे’च्या कामाचे भूमिपूजन

चिपळूण : आमदार शेखर निकम यांनी खेर्डी येथील विविध विकासकामांसाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला. यातील खेर्डी-टेरव मार्गालगत नदीवरील कॉजवे पुलाचे भूमिपूजन तसेच खतातेवाडीतील सार्वजनिक सभागृह आणि महिला बचतगट संकुल कामाचे भूमिपूजन आमदारांच्या उपस्थितीत करण्यात आले.

खेडींतील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालास विक्री व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध व्हावी त्याचबरोबर महिलांच्या विविध उपक्रमांना सभागृह निर्माण व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते यांनी आमदार निकम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार निकम यांनी महिला बचतगटाच्या संकुलास २५ लाखांचा निधी दिला. या कामी आणखी २० लाखांचा निधी लवकरच मंजूर केला जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 08/Nov/2025